Breaking News

विनाअनुदानित शाळांचे 13 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन

रत्नागिरी, दि. 07, नोव्हेंबर - राज्यातील विनाअनुदानित शाळा गेल्या सतरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी सरकार दरबारी दाद मागूनही सकारात्मक प्रतिसाद  मिळत नाही. त्यामुळे राज्य विनाअनुदानित कृती समितीतर्फे येत्या 13 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही मा हिती देण्यात आली आहे. 
राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न 17 वर्षांत सुटलेला नाही. अनुदानाच्या प्रश्‍नासंदर्भात गेल्या वर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती. मात्र  त्यानंतरही अद्याप हा प्रश्‍न कायम आहे. अनुदानाच्या प्रश्‍नाबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य विनाअनुदानित कृती समितीतर्फे मुंबईसह राज्यातील शिक्षण उपसंचालक क ार्यालयावर 13 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कास्ट्राईब संघटनेने जाहीर केले आहे. संघटनेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन  आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील 7 शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात  येणार आहे.
अनुदानाच्या प्रश्‍नाबरोबर 1 आणि 2 जुलै 2016 रोजीच्या आदेशाने शाळांना त्वरित प्रचलित नियमानुसार निधी मंजूर करून अनुदान देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण क रणार्या शिक्षण सचिव व अधिकार्यांना तत्काळ हटवावे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या या निधीसह घोषित कराव्या, 200 टक्के अनुदान घेत  असलेल्या 1 हजार 628 शाळांना व वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार ताबडतोब अनुदान देण्यात यावे, 4 ऑक्टोबर 2016 च्या आंदोलनातील सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत  यासारख्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.