संगमनेर नगरपरिषदेतर्फे ‘स्वच्छ हॉस्पिटल’ स्पर्धा
शहरातील नागरिकांना नगरपालिकेने कायमच आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेचे अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील सर्व हॉस्पीटल्स दि. २० पासून स्वच्छ हॉस्पीटल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा तांबे यांनी दिली.
संगमनेर नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृह येथे नगराध्यक्षा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष नितीन अभंग, डॉ. विकास पाचोरे, डॉ. राजीव घोडके, शुभांगी देशमुख, डॉ. घुले, डॉ. अशोक पोफळे तसेच शहरातील नामांकित हॉस्पिटलचे डॉक्टर व मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देतांना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, की स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेअंतर्गत शासनाच्यानुसार हॉस्पिटलची इमारत, याअंतर्गत इमारतीची देखभाल, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, अंतर्गत स्वच्छता, टाकाऊ साहित्यांचे विलगीकरण, पिण्याचे पाणी, पार्किंग, गार्डन आदी बाबींचा समावेश आहे. हॉस्पीटलच्यावतीने रुग्णांसाठी देण्यात येणार्या सेवेअंतर्गत स्पेशल रुम, ऑपरेशन थिएटर, लॅब्रॉटरी, आयसीयू विभाग व देखभाल, कचरा विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल डस्टबीन आदी बाबींचा समावेश आहे.

प्रत्येकास गुणांकन ठरविण्यात आलेले आहे. जास्तीतजास्त गुण प्राप्त करणार्यांना हॉस्पिटलचे मानांकन यानुसार ठरविण्यात येणार आहे. शासनाच्यावतीने घेण्यात येणार्या ‘स्वच्छ हॉस्पिटल’ या उपक्रमात शहरातील डॉक्टरांनी सहभागी होऊन स्पर्धेत मानांकन प्राप्त करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.