Breaking News

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केबिनमध्ये आग

औरंगाबाद, दि. 03, ऑक्टोबर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी कृष्णा डोणगावकर यांच्या दालनातील अ‍ॅन्टी चेंबरमध्ये किरकोळ आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने ही  आग लागताच लगेच लक्षात आल्याने काही हानी झाली नाही. सकाळी साडे दहा ते पावणे अकरा दरम्यान ही आग लागली असल्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या एका  व्यक्तीच्या लक्षात आल्याने त्याने ताबडतोब ही माहिती एस. एम. हिरेकर यांना दिली. यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्यासमवेत असलेल्या दोन शिपायांच्या मदतीने ही आग विझविली.  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी मुख्य वीज प्रवाह खंडीत केल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत भिंतीला लावण्यात आलेला पंखा खाली पडल्याने टेबलावरील  काच फुुटली. एसी, फॅनची वायरिंग व स्विच बोर्ड जळून खाक झाले.