Breaking News

सीताफळ संशोधनात कसपटे यांचे कार्य मोलाचे -प्रा. राम शिंदे

सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन गोरमाळ येथील प्रयोगशील शेतकरी कृषिरत्न नवनाथ कसपटे यांनी सीताफळच्या संशोधनात केलेले कार्य मोलाचे असल्याचे गौरवोद्धगार जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी काढले.


जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी आज गोरमाळ येथे कसपटे यांच्या मधुबन फार्म आणि नर्सरीस सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. प्रा. शिंदे यांच्या समवेत माजी आमदार राजेंद्र राऊत, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रकल्प संचालक रवींद्र माने, बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष ड. आसिफ तांबोळी, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह प रिसरातील शेतकरी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, कसपटे यांच्याकडून सीताफळ फळासाठी शेतकर्‍यांना होत असलेले मार्गदर्शन कौतुकास्पद आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्या अनुभव, संशोधनाचा लाभ घेऊन नगदी उत्पन्न मिळवून देणार्‍या या फळपिकाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी प्रा. शिंदे यांनी कसपटे यांच्या सीता फळ बागेची पाहणी केली.