Breaking News

मोबाईलचा विमा नाकारणा-या कंपनीला ग्राहक मंचाने दिला दणका

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - तक्रारदाराच्या मोबाईलची चोरी झाल्यानंतर आवश्यक ती सर्व पूर्तता करूनही संबंधित व्यक्तीला मोबाईलच्या विम्याची रक्कम देण्यास नकार देणा-या  सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने जोरदार फटकार लावीत संबंधित ग्राहकाला व्याजासहीत मोबाईलची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. तसेच  तक्रारदाराला तक्रारीपोटी व मानसिक त्रास झाल्यापोटी दंड जमा करण्याचा आदेश आदेश मंचाने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर शहरातील दीपकराज महानुभाव नावाच्या व्यक्तीने 8 एप्रिल 2015 रोजी 23 हजार 800 रूपये किमतीचा एक मोबाईल खरेदी कला होता. मात्र  9 डिसेंबर 2015 रोजी महानुभाव यांच्या मोबाईलची चोरी झाली.त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी ची फिर्याद दाखल केली व सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कंपनी ला  मोबाईल चोरीबाबत माहिती दिली.कंपनीने मागितलेली माहिती व कादगपत्रे महानुभाव यांनी सादर केली. मात्र तरीदेखील सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कंपनीने विम्याची रक्कम  देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेरीस त्यांनी अ‍ॅड.चंदन बारटक्के यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल  केली होती.या प्रकरणाची सुनावणी मंचाचे अध्यक्ष विनायक लोंढे व सदस्य चारू डोंगरे यांच्यासमोर झाली.सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहक मंचाने सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कं पनीच्या विरूध्द निकाल दिला. तक्रारदार दीपकराज महानुभाव यांना मोबाईलची किंमत म्हणून 23 हजार 800 रूपये 30 दिवसांच्या आत देण्याचा व या कालावधी मध्ये रक्कम  दिली नाही तर व्याजासहीत रक्कम देण्याचा आदेश दिला. तसेच तक्रारदार यांना ग्राहक मंचात तक्रारीच्या खर्चापोटी 1500 रूपये व त्यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी  3 हजार रूपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाने सिस्का गॅझेट सिक्युअर विमा कंपनीला दिला आहे.