Breaking News

2019 ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात - प्रफुल्ल पटेल

कर्जत, दि. 07, नोव्हेंबर - सध्या राजकारणातील दिशा ज्याप्रमाणे बदलत आहेत ते पाहून शरद पवार 2019 ला पंतप्रधान होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफु ल्ल पटेल यांनी आज केले. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे पक्षाला बदनाम करत आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही आक्रमक भूमिका घ्यावी हवी, असा सल्लादेखील पटेल यांनी पवार यांना दिला.
2014 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125 ते 140 जागांवर विजय मिळाला असता. विधान सभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात,पक्षाचा  ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे. असे शरद पवार यांना वाटते.’ असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे  संकेत दिले आहेत.