Breaking News

नगरच्या उपजिल्हा कारागृहात अंजली, नंदिनी गायकवाड भगिनींचा सत्कार

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - चुकीच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या हातून चुक होते. त्याचे प्रायश्‍चित घेण्यासाठी कारावास भोगावा लागतो. कारागृह हे आपण केलेल्या कृत्याचे  प्रायश्‍चित घेण्यासाठी असल्याने बंदी बांधवाने दररोज काहीवेळ आत्मचिंतन करण्याचे कार्यगृह आहे असे मानावे. अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका.कारागृहातून बाहेर  पडल्यानंतर आपल्यातील कर्तुत्वाने उज्वल जीवन जगण्याचा निश्‍चय करा.तुमच्या सुखातच कुटूंबाचे सुख असते हे लक्षात ठेवा,असे प्रतिपादन हभप समाधान महाराज शर्मा यांनी  अहमदनगर येथील उपजिल्हा कारागृहातील बंदी जणांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आयोजित प्रवचनात केले.
जिल्हा कारागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेची विजेती अंजली गायकवाड, नंदीनी गायकवाड,निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद क दम,जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे न्यायाधिश पद्माकर केस्तीकर,प्रसिद्ध गायक पवन नाईक,नेत्रतज्ञ डॉ.सुधा कांकरिया,मनपा विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे,सभागृहनेते गणेश क वडे,तुरुंग अधिक्षक नागनाथ सावंत,वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्यामकांत शेडगे,तुरुंग अधिकारी देविका बेडवाल,तानाजी धोत्रे,सुभेदार दशरथ जवणे,कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय  खंडागळे,लिपिक सादिक मुल्ला,वसंत सपकाळ,अंगद गायकवाड,मनिषा गायकवाड आदि उपस्थित होते.अंजली व नंदीनी गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास  सुरुवात झाली.हभप समाधान महाराज म्हणाले,जेव्हा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो तेव्हा गुन्ह्यास प्रवृत्त करणारे सुद्धा साथ सोडून देतात.मात्र आपले कुटूंबिय जामिन मिळावा  यासाठी प्रयत्नशील असतात.बंदी बांधवांला शिक्षा झाल्यानंतर सर्व कुटूंबीय त्याचे परिणाम भोगतात.समाजाकडून होणारी अवहेलना ते सहन करतात असे सांगून भगवंत श्रीकृष्णाच  जन्म कारागृहात झाला.मात्र ते पुन्हा कधी कारागृहात गेले नाहीत. तसेच आपलेच आचरण असावे,असे ते म्हणाले.सर्व जाती-धर्मातील आई ही आईच असते.मुंबईतील दहशतवादी  हल्ल्याचा उल्लेख करुन कसाबला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या देशासह त्याच्या वडिलांनीही त्याला ओळख दिली नाही. मात्र त्याच्या आईकडे चौकशी केली असता.धायमोकलून  आकांत करत कसाब आपलाच मुलगा असल्याची कबुली दिली.जगातील कुठलीही आई आपल्या मुलाची ओळख नाकारु शकत नाही. तेव्हा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर  सर्वप्रथम आपल्या आईच्या पायावर डोके ठेवून माफी मागा ते जगातील सर्वात मोठे न्यायालय आहे.यावेळी साने गुरुजींच्या श्यामच्या आईचाही त्यांनी दाखला दिला. एकदा चूक  झाल्यानंतर पुन्हा इथे यावे लागू नये याचा विचार करा.सकाळ संध्याकाळाच्या आत्मचिंतनाने अंत:करणाला शांत करा. माणूस चूक करताना विचार करत नाही.परिस्थिती आपल्या  हातून घटना घडण्यास कारणीभूत असते.मात्र मनाचे स्वास्थ्य राखले पाहिजे. योग सर्व कर्म कौशल्यातून मन स्वास्थ्य राखता येते.कारागृहातील कैद्यांना बंदी असे म्हणतात.त्याचा  अर्थ हलका नाही तर बंदे आहेत,असे सांगून समाधान महाराज शर्मा म्हणाले,एका तरुणाचे आयुष्य खराब झाले तर देश खराब होतो.आपले तारुण्य तुरुंगात घालवू नका.मोठे कार्य क रा,कुत्र्यासारखे जगण्यापेक्षा पोशिंदा बनून राजासारखे जीवन जगण्याचे ध्येय ठेवा.जे वाईट झालं ते डोक्यातून काढून टाका.रागाने नव्हे तर कर्माने माणसे मोठी होतात.विनोबांनी सां गितलेल्या गीतेमुळे हजारो माणसं घडली. कुठल्याच धर्मात गुन्हा करण्यास सांगितलेले नाही.चांगले वागा, चांगले जगा,असे आवाहन करतांना त्यांनी अनेक दाखले दिले. सरते शेवटी  विठ्ठल नामाचा गजर करतांना बंदी बांधवही महाराजांबरोबर नाचू लागल्याने कारागृहाचे वातावरण बदलून गेले.
प्रवचनानंतर सारेगमप लिटील चॅम्प विजेती अंजली गायकवाड व नंदीनी गायकवाड यांच्या मधूर भक्तीगितांनी बंदीजन व प्रमुख पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी सादर केलेल्या गीतांना  बंदी बांधवांनीही जोरदार दाद दिली.यानंतर कारागृहाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते अंजली व नंदीनी गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला.जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्याया धिश पद्माकर केस्तीकर यांनी अंजली व नंदीनी गायकवाड भगिनींचे कौतुक करुन आपण नेहमी चाकोरीबद्ध विचार करत असल्याने तिढा वाढत जातो. मात्र चाकोरी बाहेरचा विचार  करुन अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधता येतात,असे मत व्यक्त केले.यावेळी उपस्थितांनी अंगद गायकवाड यांना त्यांच्या शिष्या-मुली या भुमिकेबद्दल विचारले असता.घरात वडील या  नात्याने प्रेमळ संस्कारक्षम पित्याची भुमिका असते.मात्र, गुरु या नात्याने वागतांना शिस्तीचे बंधन येते.आवाज जपण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात.मात्र त्या व्यतिरिक्त कठोर  होण्याची वेळ माझ्या मुलींनी कधीही आणली नाही,असे अंगद गायकवाड यांनी सांगितले.डॉ.सुधा कांकरिया यांनीही या गायिकांचे कौतुक करुन स्त्री जन्माचे महत्व विषद केले. पोलीस  मित्र संघटना व अन्य संस्थांच्यावतीने गायकवाड भगिनींचा सत्कार करण्यात आला.तुरुंग अधिक्षक नागनाथ सावंत यांनी प्रास्तविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्यामकांत शेडगे यांनी केले.