अंगणवाडी सेविका काढणार हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा
बीड, दि. 05, नोव्हेंबर - अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी कुठलीही द्या पण शासकीय सेवेत द्या या एकमेव मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्याच ठिकाणी दुस-या दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मदतनीस, सेवीका संघर्ष समितीचे राज्य समन्वयक दिलीप भोसले यांनी राष्ट्रवादी भवन येथे अंगणवाडी सेविकांच्या बैठकीत दिली आहे.