जमिन हडपणा-या महिलेसह शिवसंग्राम पदाधिका-याला अटक
बीड, दि. 05, नोव्हेंबर - बीड तालुक्यातील वानगाव येथे एका निवृत्त शिक्षकाला मयत दाखवून त्यांच्या नउ एकर जमिनीवर दावा सांगून फसवणूक करणा-या महिलेसह शिवसंंग्रामचा पदाधिकारी बालाजी पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
निवृत्त शिक्षक सूर्यभान गणपती जोगदंड (रा.येळंबघाट) यांची वानगावला 9 एकर जमीन आहे. सूर्यभान, त्यांच्या पत्नी सत्यभामा व बंधू मधुकर हे तिघेही हयात असताना पारुबाई पवार या महिलेने न्यायालयात ते मयत असल्याचे सांगूून वारसा हक्कानुसार त्यांच्या जमिनीवर दावा केला होता. तलाठी एन.के.तांदळे यांनी गावात जाऊन पंचनामा केला तेव्हा जोगदंड कुटुंबातील तिघेही जिवंत असल्याचे आढळून आले. नेकनूर पोलिसांनी पारूबाईला पालवण येथील राहत्या घरातून अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पारुबाई पवार हिला बनावट कागदपत्रे शिवसंग्रामचा पदाधिकारी बालाजी पवार याचे तयार करून दिली होती म्हणून त्यालाही अटक करण्यात आली.