Breaking News

अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला शिक्षकाचा काटा !


                                                  


सावंतवाडी पोलिसांना गेल्या 11 नोव्हेंबर रोजी आंबोली घाटाच्या दरीत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता.पण मृतदेह इतका छिन्नविछीन्न होता की, त्याची ओळखच पटत नव्हती. म्हणून मग पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरात नजीकच्या काळात दाखल झालेल्या काही मिसिंग कल्पेंटची चौकशी सुरू केली असता त्यांना गडहिंग्लज मधल्या भडगाव गावातले शिक्षक विजयकुमार गुरव चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. 

विशेष म्हणजे मिसिंगची ही तक्रार त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव म्हणजेच आरोपीनेच दिली होती. खरंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अडचणी येत होत्या. पण विजयकुमार गुरव यांच्या मुलाने मृतदेहाच्या हातात बांधलेल्या धाग्यावरुन तो आपल्याच वडिलांचा असल्याचं पोलीसाना सांगितलं होतं. म्हणून मग पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी मृतदेहाच्या डिएनएचे नमुने घेऊन ते पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवून दिले.

आंबोली घाटात काही दिवसांपूर्वी बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकललंय. तो मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचे शिक्षक विजयकुमार गुरव यांचाच असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय. आपल्या प्रियकरासोबत पळून जाता यावं, यासाठी विजयकुमार गुरव यांच्या पत्नीनेच त्यांचा खून केला आणि तो मृतदेह आंबोली घाटात आणून फेकून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.