इस्त्रायलच्या चीफ ऑफ ग्राऊंड फोर्सेसने केला आर्मर्ड कोअर सेंटरचा दौरा
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - इस्त्रायली सेनेचे चीफ ऑफ ग्राऊंड फोर्सेस मेजर जनरल याकोव (कोबी)बराक यांच्या नेतृत्वा खाली इस्त्रायली सेनेच्या 6 सदस्यांच्या प्रति निधीमंडळाने अहमदनगरमध्ये आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलचा दौरा केला. या भेटी दरम्यान मेजर जनरल याकोव सहीत प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी भारतीय लष्कराची सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण संस्था असलेल्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल मध्ये दिल्या जाणा-या उच्च दर्जाच्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाबाबत बारकाईने माहिती घेतली.
आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल चे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले.तसेच कमांडट कपूर यांनी त्यांना एसीसी अँड एस च्या स्थापने पासून आज पर्यंतची उपलब्धी व प्रशिक्षण पध्दतीबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रतिनिधी मंडळाला आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल मध्ये दिल्या जाणा-या आधारभूत, अत्याधुनिक तांत्रिक व युध्द प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली. प्रतिनिधी मंडळाने सेंटरमधील स्कूल ऑफ टेक्निकल ट्रेनिंग,स्कूल ऑफ आर्मर्ड वॉरफेयर ची देखील पाहणी केली. यावेळी रिक्रुट व युवा अधिका-यांनी प्रशिक्षण कौशल्याचे प्रदर्शन केले.या दौर्याच्या वेळी इस्त्रायल च्या प्रतिनिधी मंडळाने विश्वविख्यात कॅवलरी टैंक म्युझियमलाही भेट दिली.