राज्य मल्लखांब स्पर्धेसाठी नगरच्या 9 खेळाडूंची निवड
अहमदनगर, दि. 05, नोव्हेंबर - नगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत महावीर नगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटर (एमएमवायटीसी)च्या नऊ खेळाडूंनी बाजी मारली व त्यांची निवड चिपळूण येथे होणार्या राज्यस्तरीय मल्लखांब अजिक्यपद व निवड स्पर्धेसाठी झाली आहे.
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आज या खेळाडूचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडू चिपळूणला रवाना झाले. उद्या होणार्या या स्पर्धेत महावीर नगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या गौरी चौरे, गौरी गौड, आर्या चोरगे, नक्षत्रा आडेप, शर्वरी पालवे, प्राजक्ता दळवी, अनिकेत सुसरे, हर्षल भागवत, सिद्धार्थ राजगुडे या खेळाडूंचा समावेश आहे.मागील सहा वर्षे रोज संध्याकाळी 2 तास हे खेळाडू उमेश झोटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात त्यांना प्रणिता तरोटे यांचेही मार्गदर्शन मिळते.सावेडी रोडवरील ओबेराय हॉटेल मागील महावीर नगर येथील मैदानावर एमएमवायटीसी हा क्लब असून या ट्रेनिंग सेंटर मधील 4 वर्षांपसून 20 वर्षांपर्यंतचे सुमारे 80 खेळाडू योगा, जिमिनॅस्टिक ,मल्लखांब,रोप मलखांब या खेळाचा सराव करतात.यातील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीयस्तरावरील पारितोषिके मिळवलेली आहे.