Breaking News

नोटाबंदीमुळे महागाई किंवा मंदी नाही - चंद्रकांत पाटील

जालना, दि. 09, नोव्हेंबर - नोटाबंदीमुळे देशात कुठेही महागाई किंवा मंदी नाही विरोधकांनी विनाकारण त्या नावाने कांगावा सुरू केला आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी केला आहे. जालना येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. नोटाबंदीमुळे लोकांची पिळवणूक करून गाद्यांमध्ये नोटा भरून ठेवणा-यांना त्या नोटा बँकेत जमा क राव्या लागल्याचे त्याचे दुखणे जास्त आहे. मात्र सर्वसामान्य माणूस नोटाबंदीमुळे खुश आहे. लोक आता कॅशलेस व्यवहाराकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून त्याची चांगलीच सवय  गावपातळींपर्यंत सर्वसामान्यांना झाली आहे. निकोप अर्थरचनेच्या दृष्टीने ती एक चांगली गोष्ट आहे असे ते म्हणाले. नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने या निर्णयाला विरोध  क रण्यासाठी विरोधी पक्षांनी निषेधाचे विविध कार्यक्रम केले त्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. नोटाबंदीमुळे मोठ्या लोकांनी लपविलेला काळा  पैसा विकासाच्या प्रवाहात आला आहे असे ते म्हणाले.