दिवा परिसरात 9 किलोची स्फोटके जप्त
ठाणे, दि. 25, नोव्हेंबर - ठाण्यातील दिवा परिसरात 9 किलो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्यामध्ये इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि जिलेटीनच्या ट्यूब आढळून आल्या असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
काही व्यक्ती स्फोटकांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत्याच पोलिसांनी सापळा रचून दिलीप राणे, नितीन डोंगरे, नितीन कावनकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 31 डिटोनेटर आणि 61 जिलेटीनच्या ट्यूब हस्तगत करण्यात आल्या आहेत.