Breaking News

अज्ञात व्यक्तीने पेटविल्या सोसायटीतील 9 दुचाकी

पुणे, दि. 04, नोव्हेंबर - काही दिवसांपूर्वीच्या दुचाकी पेटवून देण्याच्या घटने पुनरावृत्ती झाली आहे. सदाशिव पेठेतील वेस्टर्न इंडिया या एलआयसी सोसायटीत हा प्रकार घडला आहे. पहाटे सव्वा दोनच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिकांचा दावा आहे.
आगीच्या घटनेनंतर तातडीने अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत दुचाकींचा अक्षरश: कोळसा झाला होता. जवळपास 9 दुचाकी यात जळून खाक झाल्या आहेत. सोसायटीमधील रहिवासी महिलेने सांगितले, की गेली 10 वर्षे सोसायटीत असा प्रकार कधीच घडला नव्हता. काही दिवसांपूर्वी काही दुचाकीमधील पेट्रोल चोरीचे प्रकार घडले होते. त्यानंतर अचानक दुचाकी पेटवून देण्याची घटना घडली आहे. दुचाकी पेटविण्याच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी सोसायटीजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारावर पुढील तपास सुरू आहे.