Breaking News

विरारमधील प्राथमिक शाळेचे छत कोसळले; जीवितहानी नाही

विरार, दि. 11, नोव्हेंबर - विरारमधील आडणे येथील प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर हे छत कोसळल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेमुळे प्राथिमिक शाळांच्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
शाळेच्या इमारतीचा काही भाग दिवाळीपूर्वीच खचला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने सुट्टीच्या काळात त्याची डागडुजी केली नाही. येथील विद्यार्थी या धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरूनच शिक्षण घेत आहेत. सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सध्या येथे 50 ते 60 विध्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. मोडकळीस आलेल्या या शाळेची दिवाळीच्या काळात डागडुजी केली जाईल अशी अपेक्षा पालकांना केली होती. मात्र, दिवाळीतही डागडुजी करण्यात आलेली नाही.