परभणी जिल्हयात 77 हजार रुपयांचा गुटखा जप्त
परभणी : अन्न व औषध प्रशासनाने गंगाखेड शहरातील केदारनाथ मुरलीधर दाड आणि परभणी येथील गणेश ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकून 77 हजार 500 रुपयांचा गुटखा जप्त केला़
मराठवाडयात गुटख्यांच्या अवैधरित्या साठवणुकीच्या घटना वाढत असून बीड, जालना ,औरंगाबाद पाठोपाठ परभणी जिल्हयातही गुटख्याचे साठे सापडत आहेत.18 नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील स्टेशन रोड भागातील भारत पान मटेरियल आणि वसमत रोडवरील श्री साई स्टोअर्स या दुकानांवर छापा टाकून 36 हजार 202 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त होती.
