गाडीची काच फोडून चार लाख रूपयांची रोकड लंपास
पुणे, दि. 11, नोव्हेंबर - रस्त्याच्या कडेला कार पार्क करून नाष्टा आणि चहा घेण्यासाठी हॉटेलात गेलेल्या तरुणाला नाष्टा आणि चहा चांगलाच महागात पडला. या कारच्या दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी गाडीत बॅगमध्ये ठेवलेली चार लाख रूपयांची रोकड लंपास केली. दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील प्रेम इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या समोर ही घटना घडली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्याचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून हे फुटेज ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रविण झांबरे (वय 27, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण यांची उरुळी कांचन येथे शेती असून ते दूधाचाही व्यवसाय करतात. प्रविण यांचे नातेवाईक गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी ते पूना हॉस्पिटलला आले होते. हॉस्पिटलचे बील आणि औषधासाठी नातेवाईकांना देण्यासाठी प्रविण यांनी घरून पाच लाख रूपये आणले होते. मात्र, उपचारासाठी एक लाख रूपये आवश्यक असल्याने नातेवाईकांनी प्रविण यांच्याकडून एक लाख रूपये घेतले होते. उर्वरीत चार लाख रूपयांची रकम घेऊन त्यांनी ती कारमध्ये पाठीमागच्या सीटवर ठेवली होती. भूक लागली म्हणून प्रविण आणि त्यांचा मित्र नाष्टा करण्यासाठी तसेच चहा घेण्यासाठी नगर रस्त्यावर कार पार्किंग करून एका हॉटेलमध्ये गेले होते. ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडली आणि पाठीमागच्या सीटवर ठेवलेल्या बॅगेतून ही चार लाख रूपयांची रोकड लंपास केली. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात या चोरट्याचे छायाचित्र कैद झाले असून विमानतळ पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करत आहेत.