400 एकर जमिनीवर निजामच्या वंशजांचा दावा
औरंगाबाद, दि. 19, नोव्हेंबर - औरंगाबादमध्ये चारशे एकरपेक्षा जास्त जमिन निजामच्या मालकीची असल्याचा दावा निजामच्या वारसदाराच्या वतीने दिलशाजजा यांनी केला आहे.
सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांना निजाम राज्याचे भारतात विलिनीकरण करताना निजामची संपत्ती त्यांच्याच नावे सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन भारत सरकारकडून देण्यात आले होते. मात्र नंतर आमची परवानगी न घेता अनेकांनी वफ्फ बोर्डाशी हातमिळवणी करून ती जमिन लुबाडली असून ती परत न मिळाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माजी मंत्री रफिक झकेरिया व इतरांनी ही जमिन लुबाडल्याचा आरोप त्यांनी केला.
