Breaking News

सिडको भागात 35 वर्षीय महिलेचा विनयभंग

औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - सिडको भागात एका 35 वर्षीय महिलाचा हात धरुन तिला शिवीगाळ करुन विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सिडको भागात राहणारे  भास्कर निवृत्ती मुगदल आणि निवृत्ती भागाजी मुगदल या दोघा जणांनी संगणमताने फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली यावेळी फिर्यादी महिला अंगणात आली  असता निवृत्ती मुगदल याने पाठीमागुन येऊन त्या महिलेचा उजवा हात वाईट उद्देशाने धरुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तुझ्या नव-याला माझ्याबद्दल काही सांगितले  तर मी तुला सोडणार नाही. मी तुला पुन्हा मारहाण करेल असे तो म्हणाला. भयभीत झालेल्या महिलेने घडलेला प्रकार सिडको पोलिसांना सांगितल्यावर आरोपीविरुध्द काल गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.