प्रेस क्लब व लायन्स क्लबच्या वतीने 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
निष्कर्ष होलम या बालकाच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आले. प्रास्ताविक हरजितसिंग वधवा यांनी केले. कवी संजय आंधळे यांनी आपल्या कवितांद्वारे शहिदांना श्रध्दांजली वाहिली. देशांच्या सीमांचे रक्षण लष्करातील जवान करत असतात. तर देशांतर्गत सुरक्षा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल कार्यरत असते.
देशावर संकट आल्यास भारतीय जवान व पोलिसांनी अनेकवार शौर्याचा परिचय देत प्राणाची आहुती दिली आहे. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी नागरिकांनी देखील जागृक राहून, देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.