भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्याने इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल.
नवी दिल्ली : विमानसेवा देणारी कंपनी ‘इंडिगो एअर लाईन्स’ने भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कंपनीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवासी असलेले प्रमोद कुमार जैन यांनी याबाबत तक्रार केली आहे.
दिल्लीच्या सरगोजनी नगर पोलस स्थानकात इंडिगोविरोधात कलम 124(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कुमार हे 10 नोव्हेंबरला बंगळूरू येथून इंडियोगाच्या 6ए95 या विमानाने दुबई जात होते. त्यांच्या तिकीटासोबत जेवण समाविष्ट नसल्याने त्यांनी जेवणाची वेगळी ऑर्डर दिली.
पण त्यासाठी त्यांनी भारतीय पैसे देऊ केले असता कर्मचा़र्याने पैसे स्वीकाण्यास नकार देत, आम्हाला केवळ परदेशी चलन स्वीकारण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. जैन यांनी अनेकदा विनंती करूनही भारतीय चलन त्यांनी स्वीकारले नाही, त्यानंतर प्रमेद कुमार जैन यांनी इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.