घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त.
सुनील उर्फ सुशील बबन भोसले (वय-27, रा.राम नगर, पेरणे फाटा, भीमा कोरेगाव, मूळ अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हा पेरणे फाटा येथून सिक्स सिटर आणि पीएमटी बसने सिंहगड रोड परिसरात यायचा आणि वॉचमन नसलेल्या सोसायटीत प्रवेश करून पोपट पकड व कटावणीच्या साहाय्याने बंद फ्लॅट फोडायचा.
अशाप्रकारे त्याने दिवसाढवळ्या 12 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापुर्वीही येरवडा, विश्रांतवाडी, चिंचवड परिसरात घरफोड्या केल्या आहेत. त्यासंदर्भात त्याला 2009 मध्ये तुरूंगवासही झाला होता.