Breaking News

मुख्यमंत्री गुंडाना घेऊन कारभार करत आहेत. या मंत्रिमंडळात मला रस नाही - उद्धव.

मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकावं म्हणून. मी सरकारमध्ये राहून बोलतोय कारण इथल्य सामान्य माणसांच्या व्यथा कमी करायच्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हे मुख्यमंत्री गुंडाना घेऊन कारभार करत आहेत. या मंत्रिमंडळात मला रस नाही. मला माझं हक्काचं मंत्री मंडळ हवंय अस स्पष्टीकरण  उद्धव ठाकरे यांनी दिल.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत,येथील नेसरीमध्ये त्यांची जाहीर सभा झाली.यावेळी ते बोलत होते,त्यांनी भाजप सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. 



हे माझं सरकार नाही आणि मी लाभार्थी नाही"

उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांकडे पाणी, वीज नसल्यामुळे पिकं जळून जात आहेत. सरकार म्हणतंय "हे माझं सरकार, मी लाभार्थी" पण आता "हे माझं सरकार नाही आणि मी लाभार्थी नाही" अशी जाहिरातच करावी लागणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्ही गेलो की हे नांदायला जाणार"

शरद पवार म्हणतात,सत्तेत नांदता येत नाही तर वेगळं व्हा..अरे वा...म्हणजे आम्ही वेगळं होताच...हे नांदायला जाणार. हे त्यांचं राजकारण.. ते काय आम्हाला समजत नाही. १५ वर्ष काँग्रेसची भांडी घासली आणि आम्हाला सांगतात. सत्तेत कशाला राहतात अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली.



ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा