Breaking News

सायना नेहवाल, सिंधूची विजयी सलामी.


नवी दिल्ली : भारताच्या सायना नेहवालसह रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने चार लाख डॉलर्स रकमेची पारितोषिके असलेल्या हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या गटात मात्र परूपल्ली कश्यप आणि सौरभ वर्माचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

विश्वक्रमवारीत अकराव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने यंदाच्या हंगामात विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. सायनाने विश्वक्रमवारीत ४४ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या मेथे पॉलसेनचा २१-१९, २३-२१ असा पराभव केला. हा सामना जिंकण्यास सायनाला ४६ मिनिटेच लागली. 


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा