खंडणीसाठी मित्रांनीच केल मित्राच अपहरण आणि खून.
मयत मयूर डोळसे हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील मुंडाळा गावातील रहिवासी असून तो कल्याण पूर्वेत एका भाड्याच्या घरात राहत होता. लोअर परळ येथे रेल्वेत प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला होता, तर दोघेही आरोपी हे अंबरनाथमधील वडवली येथे राहणारे असून ते मयूरच्या गावातील असल्याने त्यांची पहिल्यापासून ओळख होती. गोकुळ आणि प्रमोद यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी मयूरच्या कुटुंबाकडून खंडणी उकळण्याचा कट रचून मयूरला ८ नोव्हेंबरला आरोपी गोकुळने भेटायला बोलावले होते.