दक्षिण अटलांटिक महासागरात अर्जेंटिनाची पाणबुडी ४४ जवानांसह बेपत्ता
दक्षिण अटलांटिक महासागरात गस्तीवर असलेली अर्जेंटिनाची पाणबुडी गत आठवड्यात बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या पाणबुडीवर जवान-अधिकारी असे एकूण ४४ जण होते. अर्जेंटिनाच्या नौदलाकडून आंतरराष्ट्रीय समूहाच्या मदतीने या पाणबुडीचा युद्घ पातळीवर शोध घेतला जात आहे.
पाणबुडीद्वारे काही आपत्तकालीन सिग्नल मिळले आहेत. मात्र, पाणबुडीचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. अमेरिका, ब्रिटेन, कोलंबिया, उरुग्वे, पेरू , चिली आणि ब्राझील या देशांकडून अर्जेंटिनाला शोध अभियानात मदत केली जात आहे.
दक्षिण अटलांटिक महासागरात गत बुधवारी शेवटच्या वेळेस अर्जेंटिनाच्या 'एआरए सॅन जुआन' पाणबुडीसोबत संपर्क झाला होता. यानंतरपासून बेपत्ता झालेल्या या पाणबुडी अद्याप कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. या पाणबुडीवर ४४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा