Breaking News

आता फ्रीज, वॉशिंग मशीन या वस्तू होणार स्वस्त !


उच्च जीएसटी दर असलेल्या वस्तूंंना कमी जीएसटी दराच्या गटात समाविष्ट करण्याची आणखी एक फेरी सरकार घेणार आहे. या वेळी जीएसटीच्या २८ टक्के गटात असलेल्या फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू (व्हाईट गुड्स) कमी कर असलेल्या गटात समाविष्ट करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या वस्तू स्वस्त होतील. 

सरकारने उच्च कर यादीतून या वस्तू वगळल्यासा सध्या मंदी आणि उच्च अबकारी शुल्कामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन मिळू शकेल. तसेच या वस्तू स्वस्त झाल्यास खप वाढेल व अर्थव्यवस्थेस देखील चालना मिळेल. 


जीएसटी परिषदेने मागील बैठकीत या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र, अनेक स्तरांवरून सरकारवर दबाव येत असल्यामुळे या वस्तूंवरील कर कमी होणे ही आता फक्त औपचारिकताच उरली आहे. विशेषत: व्यापारी, उद्योजक आणि राजकीय पक्ष या वस्तूंवरील कराची पुनर्रचना करून तो कमी करण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा