दखल... काँग्रेसचा ऐनवेळी आत्मघात
मागच्या चार-साडेचार वर्षांपूर्वी मोदी यांची चायवाला म्हणून संभावना करण्यात आली होती, त्या वेळी या टीकेची संधी म्हणून भाजपनं देशभर चाय पे चर्चा कार्यक्रम आयोजित केली. त्यातून काँग्रेस कशी गरिबांविरोधात आहे, कष्टाचं काम करणर्यांची काँग्रेस कशी उपेक्षा करते, हे दाखवून दिलं होतं. मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी खालच्या पातळीवर टीका करण्याची काँग्रेसजणांची सवय जात नाही.
भाजपत अनेक लोक कमरेचे सोडून टीका करतात; परंतु त्यांच्याकडं सत्ता आहे आणि ते ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या टीकेवर तुटू पडतात, त्याचं भांडवल करतात, तसं भांडवल काँग्रेसजण करू शकत नाहीत. एकतर सत्ता गेल्यामुळं त्यांच्यातील ऊर्जाच संपली आहे. दुसरीकडं रस्त्यावर येण्याची सवय सत्तेच्या मस्तीमुळं राहिली नाही. भाजपनं जे केलं, तेच आपण केलं पाहिजे, हा अट्टहास तरी कशासाठी धरायचा ?
भाजपत अनेक लोक कमरेचे सोडून टीका करतात; परंतु त्यांच्याकडं सत्ता आहे आणि ते ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या टीकेवर तुटू पडतात, त्याचं भांडवल करतात, तसं भांडवल काँग्रेसजण करू शकत नाहीत. एकतर सत्ता गेल्यामुळं त्यांच्यातील ऊर्जाच संपली आहे. दुसरीकडं रस्त्यावर येण्याची सवय सत्तेच्या मस्तीमुळं राहिली नाही. भाजपनं जे केलं, तेच आपण केलं पाहिजे, हा अट्टहास तरी कशासाठी धरायचा ?
परंतु, तेवढाही समंजसपणा अजून काँग्रेसमध्ये यायला तयार नाही. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीला दुखवल्या पाठोपाठ आता मोदींवरील टीका मागं घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. संधी असेल, तर तिचं सोनं करता यायला हवं; परंतु ती कला नसेल, तर संधी दार ठोठावून जात असते आणि अपयश आपला पिच्छा सोडायला तयार नसतं. काँग्रेसचं सध्या तसं झालं आहे. गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेलं वादग्रस्त टि्वट मागं घ्यायची वेळ काँग्रेसचं ऑनलाईन मॅगझिन युवा देश वर आली आहे. मोदी यांचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतपˆधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो युवा देशनं टि्वट केला होता. आप लोगोंने देखा विपक्ष मेरे कैसे कैसे मेमे बनवाता है ? असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. ‘उसे मेमे नही मेम कहते है’ असं कॅप्शन ट्रम्प यांच्या फोटोला देण्यात आलं. त्यानंतर तू चाय बेच असं कॅप्शन थेरेसा मे यांच्या फोटोला देण्यात आलं.
मोदींबद्दलचं हे वादग्रस्त टि्वट अंगाशी आल्यावर युवा देशनं हे टि्वट डिलीट केलं; पण भाजप नेत्यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचं हे टि्वट गरीब विरोधी आहे, यावरून काँग्रेसची गरिबांबाबतची भूमिका कळते, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रवीशंकर प्रसाद आणि शाहनवाझ हुसैन यांनीही या टि्वटवरून काँग्रेसवर निशाणा साधला, तर काँग्रेस ठरावीक कालावधीनंतर अशाप्रकारे आत्महत्या का करतं ? असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी उपस्थित केला आहे. या टि्वटबद्दल सगळीकडून टीका सुरू झाल्यावर काँग्रेस मात्र बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं आहे.
अशा प्रकारच्या विनोदबुद्धीचं आम्ही समर्थन करत नाही. आमच्या धोरणांमध्ये आणि मतांमध्ये फरक असला, तरी काँग्रेस पंतप्रधान आणि सगळ्या विरोधकांचा आदर करतं, असं टि्वट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदी यांच्याबद्दल वादगˆस्त वक्तव्य केलं होतं. मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी त्यांना यायचं असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं मणीशंकर अय्यर जानेवारी 2014 मध्ये म्हणाले होते. एकीकडं गुजरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच काँग्रेस एका टि्वटमुळं अडचणीत आली आहे. या टि्वटमध्ये मोदींच्या चायवाला प्रतिमेचा वाद उकरून काढण्यात आला आहे. युथ काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हँडलवर एक छायाचित्र (मीम) पोस्ट करण्यात आलं. युवा देश या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हँडलवर हे मीम पोस्ट करण्यात आलं होतं.
वादानंतर युवा देशने हे टि्वट हटवलं. काँग्रेसच्या या टि्वटवर उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र मौन बाळगून आहेत. हिवाळी अधिवेशन लवकर घ्या, असं टि्वट त्यांनी केलंय. पण आपल्या युवक काँग्रेसच्या या घोडचुकीवर ते गप्प आहेत. थोड्याच दिवसांत ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असा अंदाज आहेच पण तरीही या बाबतीत ठोस भूमिका घेणं त्यांनी टाळलं.
यावरून भाजपकडूनच नाही तर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होतं आहे. एकीकडं ही स्थिती असताना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी, मोदींचा हात आणि गळा कापू शकणारेही बरेच लोक या देशात आहेत, अशी टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनीही त्याच पद्धतीनं सडेतोड जबाब दिला. मोदी यांच्याकडं बोट दाखवणार्यांचे हात कापू, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी केलं होतं. त्यावरून बराच गदारोळ झाला.
ओबीसी मेळाव्यात नित्यानंद राय यांनी मोदींकडं जे बोट दाखवतील, त्यांचे हात कापू असं भडक विधान केलं होतं. त्यावरून बरीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर राय यांनी या विधानासाठी माफीही मागितली होती. तसंच सीबीआयच्या नोटिसांबद्दल विचारलं असता आपण या संस्थांना भीक घालत नाही आणि उत्तर ही देणार नाही, असं उत्तर राबडीदेवींनी दिलं. सीबीआयला जर राबडी देवींची चौकशी करायची असेल, तर त्यांच्या घरी येऊन विचारावं, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी यांच्यावर टीका करताना भान राखलं नाही, की काय होतं, याची प्रचिती काँग्रेसला आली आहे.