कोपर्डी : आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्या : उज्वल निकम
मंगळवारी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोन आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद करून आरोपींना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. बुधवारी न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर तिसरा आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड.खोपडे यांनी युक्तीवाद केला. भवाळ याचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झालेला नाही. तसेच त्याच्या विरूध्द कोणताही सबळ पुरावा नाही.
त्याला या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. त्यामुळे त्याला देखील कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी अॅड. खोपडे यांनी न्यायालयाला केली. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तब्बल सव्वा तास अतिशय घणाघाती युक्तीवाद केला.13 विविध मुद्यांच्या आधारे युक्तीवाद करतांना निकम यांनी काही महत्वाच्या खटल्यांचे संदर्भ न्यायालयात दिले.
गुन्हा करणार्या इतकाच गुन्ह्याचा कट करणाराही दोषी असतो हे सांगतांना त्यांनी स्व. इंदिरा गांधी खून खटला व संसदेवरील हल्याच्या संदर्भात अफजल गुरू या आरोपीचा झालेल्या फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केला. कोपर्डी येथील या घटनेच्या पूर्वी 2 दिवस अगोदर म्हणजे 11 जुलै 2016 रोजी आरोपींनी सदर पीडित मुलीस रस्त्यावर अडवून तिला बाजुला ओढण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने आरोपींना काही करता आले नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय नियोजन पूर्वक कट करून 13 जुलै रोजी सायंकाळी पीडित मुलीला अडवून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तसेच तिला हालहाल करून तिचा खून केला. आरोपी जितेंद्र शिंदे ने बलात्कार केल्यानंतर संतोष भवाळ यास मोबाईलवर मिस कॉल करून इशारा दिला होता.
मात्र त्याचवेळी पीडित मुलीची आई व अन्य लोक आल्याने आरोपी पळून गेले. या प्रकरणी तीनही आरोपी एकसारखेच दोषी असल्याने तिघांनाही मृत्यु दंडाची म्हणजे फाशीची शिक्षा देण्याची मागणी अॅड. निकम यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी 29 नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली.
आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तब्बल सव्वा तास अतिशय घणाघाती युक्तीवाद केला.13 विविध मुद्यांच्या आधारे युक्तीवाद करतांना निकम यांनी काही महत्वाच्या खटल्यांचे संदर्भ न्यायालयात दिले. गुन्हा करणार्या इतकाच गुन्ह्याचा कट करणाराही दोषी असतो हे सांगतांना त्यांनी स्व.इंदिरा गांधी खून खटला व संसदेवरील हल्याच्या संदर्भात अफजल गुरू या आरोपीचा झालेल्या फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केला.