पटेलांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा शब्द : हार्दिक पटेल
पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.अर्थात उघडपणे तशी घोषणा करण्याचे हार्दिकने टाळले आहे.पाटीदार समाजाच्या आरक्षणासह आमच्या सर्व मागण्या काँग्रेसने मान्य केल्याचे त्याने आज स्पष्ट केले.
हार्दिकच्या या भूमिकेमुळे गुजरातमध्ये भाजपची सत्त उलथवण्यासाठी जंग-जंग पछाडणाऱया काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपविरोधात एल्गार पुकारणारा हार्दिक पटेल याची गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेससोबात चर्चा सुरू होती.
मात्र,हार्दिक मागण्या काँग्रेसला मान्य होत नसल्यामुळे उलटसुलट बातम्या येत होत्या.त्यातच काल झालेल्या जाहीर सभेत हार्दिकने काँग्रेसवरही टीका केल्याने संभ्रम निर्माण झाला होता.