ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक पूझ क्षेपाणस्त्र ब्राह्मोसची बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई या जेट विमानावरून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली.
आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्यात घेण्यात आल्या आहे. मात्र भारताने इतिहासात पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशाबद्दल भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचश अभिनंद केले आहे,हे एतिहासिक यश असून या चचणीमुळे भारताने विश्वविक्रम केला आहे’,असे सीतारामन यांनी म्हटले आहे.