Breaking News

भाजपा पदाधिकारी शिवीगाळ करत असल्याने संतप्त अधिकारी सामूहिक रजेवर !


उल्हासनगर : निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची ओरड करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजपा पदाधिकारी, सभापतीचा मुलगा, माजी नगरसेवक हे तिघे शिवीगाळ करत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला असून या प्रकाराने संतप्त झालेले हे अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.

महापौर मीना आयलानी यांच्या दालनात असणारे भाजपाचे पदाधिकारी पी. एस. आहुजा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापती सरोजिनी टेकचंदानी यांचा मुलगा राजेश टेकचंदानी आणि आरोग्य सभापती दीपा पंजाबी यांचे माजी नगरसेवक पती नारायण पंजाबी हे तिघे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, दमदाटी करत असल्याने आम्ही प्रकाराने त्रस्त झालो आहोत. 


त्यामुळे आम्ही सामूहिक रजेवर जात असल्याचे पत्र शहर अभियंता राम जयस्वार, कनिष्ठ अभियंता जितू चोइथानी, महेश सितलानी, अश्विनी आहुजा, तरुण सेवकानी, संदीप जाधव, दीप्ती लादे यांनी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्यालय उपायुक्तसंतोष देहरकर यांना दिले आहे. 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा