Breaking News

सुनावणीसाठी कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या सोमवारी हजर.

लंडन : भारताकडे प्रत्यार्पण करण्यापूर्वी ब्रिटनच्या न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसाठी कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या सोमवारी हजर राहिला. भारतातील राष्ट्रीयकृत बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज थकवून मल्ल्या ब्रिटनच्या आश्रयाला आला आहे. 


गुन्हेगार प्रत्यार्पण करारानुसार भारताने ब्रिटनकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर प्रत्यार्पणासाठीचे वॉरंट बजावले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, काही वेळातच न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. 

सध्या मल्ल्या जामिनावर सुटला आहे. त्याच्यावरील प्रत्यार्पणाची प्रत्यक्ष सुनावणी ब्रिटनच्या न्यायालयात ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या खटल्यात ब्रिटनची 'क्राऊन प्रॉसिक्युशन स्व्हिहस'भारताच्या वतीने बाजू मांडत आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा