Breaking News

भाजपकडून तीन मंत्र्यांसह एकूण १६ विद्यमान आमदारांना डच्चू.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. अशात पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांचा पक्षावर रोष आहे. या धामधुमीत भाजपने २८ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात १० नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. 


गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने २८ उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने तीन मंत्र्यांसह एकूण १६ विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आला आहे. मंत्री जयंती कवाडिया, वल्लभ वाघासीया आणि नानू वनानी अशी तिकीट नाकारलेल्या मंत्र्यांची नावे आहेत. 

दरम्यान, गुजरात निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत १८२ पैकी १३४ उमेदवारांची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा