Breaking News

गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवणार.


अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा फिस्कटली असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवणार आहे. राज्य निवडणूकीत सर्व १८२ जागांवर उमेदवार उभे करण्याची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे. 

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने २००७ आणि २०१२ साली काँग्रेसबोत आघाडी करून गुजरात निवडणूक लढविली होती. सद्यस्थितीत राज्यात राष्ट्रवादीच्या दोन जागा आहेत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अधिक जागा देण्याची मागणी केली. मात्र त्यावर काँग्रेससोबत मतैक्य झाले नाही. त्यामुळे अखेर दोन्ही पक्षांची आघाडी तुटली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, काँग्रेससोबतची बोलणी फिस्कटली असून आता आम्ही सर्व १८२ जागा स्वबळावर लढणार आहोत. काँग्रेसशी हातमिळवणी करण्यापेक्षा सर्व जागांवर निवडणूक लढवणे अधिक चांगला पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा