बँकांचे व्यवहार मराठीत न झाल्यास बँकांना दणका - अखिल चित्रे
मुंबई, दि. 21, नोव्हेंबर - महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे-कुर्ला संकुलातील पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक व अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. बँकांनी मराठीत व्यवहार करणे हा आरबीआयचा नियम असल्याने बँका ते करणे का टाळत आहेत ? तसेच यापुढे हे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे बँकांना दणका देण्यात येईल, असा इशारा वांद्रे येथील मनसेचे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिला.
वांद्रे-कुर्ला या परिसरात अनेक बँकांचे मुख्य कार्यालये आहेत. इथे भारतातील नाही तर आंतरराष्ट्रीय बँकांचेही कार्यालये आहेत. आम्ही आज फक्त या तीन बँकांमध्ये जाऊन पत्र देऊन आलो आहोत. परंतु येणार्या दिवसांत प्रत्येक बँकांमध्ये मनसेचे हे पत्रक पोहचेल. भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बँकांना सुद्धा त्यांचे व्यवहार मराठीत करायला भाग पाडू, असेही चित्रे यांनी स्पष्ट केले.
बँकांनी अजून दोनशे भाषांत त्यांचे व्यवहार करावेत, आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठीतून व्यवहार करणेही बँकांना अनिवार्य आहे, असेही चित्रे म्हणाले. मा.राजसाहेब ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत सांगितल्याप्रमाणे महाक सैनिक या सगळ्या बँकांमध्ये जाऊन पत्र देईल, भल्याबुराने ऐकले तर ठीक नाहीतर मनसेचा दणका दाखवून देऊ, असा इशाराही चित्रे यांनी बँकांना दिला आहे.