घरकुल वंचितांची घरे साकारण्यासाठी लॅण्ड पुलींग रेग्युलेशन कायद्याची आग्रही मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षापुर्वी घोषणा झालेल्या पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित लॅण्ड पुलींग रेग्युलेशन कायदा असतित्वात आनण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या कायद्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
पंतप्रधान आवास योजनेची घोषणा होवून तीन वर्ष लोटले. मात्र महाराष्ट्रात आज पर्यंन्त एकही प्रकल्प घरकुल वंचितांसाठी उभा राहिला नाही. हीच परिस्थिती संपुर्ण देशात आहे. सरकारकडे जागा उपलब्ध नसल्याने सदर योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणात खडकाळ व मालरान जमीनी पडून आहे. मुळ मालकाच्या संमतीने अथवा शासकिय पडिक जमीनी लॅण्ड पुलींग रेग्युलेशन कायद्याद्वारे शासनाने ताब्यात घेवून, तेथे सोयी सुविधा उपलब्ध करुन इन्फास्ट्रक्चर उभारल्यास, तीस टक्के जमीन रस्ते व मैदानासाठी सोडून जमीन मालकाला कमर्शिअल व रेसीडेन्शीअल प्लॉट उपलब्ध करुन दिल्यास उर्वरीत जागेत घरकुल वंचितांचे घरे होणार आहेत.
अॅड.कारभारी गवळी म्हणाले की, घरकुल वंचितांना लॅण्ड पुलिंग अॅक्टशिवाय न्याय मिळू शकत नाही. प्रत्येक शहरात घरकुल वंचितांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मात्र जागा उपलब्ध नसल्याने पंतप्रधान आवास योजनेला गती मिळू शकली नाही. घर होण्यासाठी जागा हा मुख्य प्रश्न असून, तो लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे सोडवता येवू शकतो. महाराष्ट्रासह देशात हा कायदा असतित्वात आल्यास घरकुल वंचितांचा प्रश्न मिटून, आधुनिक उपनगराची निर्मिती होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

अशा पध्दतीने जमीन मालकाचा दुप्पट फायदा होणार असून, शासनाला देखील या माध्यमातून मोठा महसुल मिळणार आहे. सरकारी तिजोरीवर कमी खर्च पडून लॅण्ड पुलींग रेग्युलेशन कायद्याद्वारे ही योजना उत्तम प्रकारे राबविली जाणार असल्याची भुमिका संघटनेने मांडली आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना पुणे येथील मगर पट्टा या कायद्याच्या आधारे विकसित करण्यात आला होता. तसेच आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंध्राची राजधानी असलेल्या अमरावती शहरात लॅण्ड पुलींग रेग्युलेशन योजना उत्तम प्रकारे राबविली. हा कायदा असतित्वात आनण्यासाठी पवार व नायडू या दिग्गज नेत्यांची मदत घेणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांना राष्ट्रीय लॅण्ड पुलिंग मार्शल्स उपाधीने सन्मानित करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.
आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी अनेक सरकारी जागा बिल्डरांच्या घश्यात घालण्यात आल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात घरकुल वंचित आहेत. भावी पिढीच्या कल्याणासाठी त्यांना हक्काचा निवारा असणे अत्यंत गरजेचे आहे. दर दहा वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार करावा लागतो. वैद्यकिय, शैक्षणिक, आरोग्य आदि हेतूंसाठी जागा आरक्षित केली जाते. बेघरांसाठी महापालिकेच्या वतीने किती जागा आरक्षित करण्यात आली? हा जाब विचारण्याची गरज असल्याचे सांगून, घरकुल वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी सांगितले.
अॅड.कारभारी गवळी म्हणाले की, घरकुल वंचितांना लॅण्ड पुलिंग अॅक्टशिवाय न्याय मिळू शकत नाही. प्रत्येक शहरात घरकुल वंचितांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मात्र जागा उपलब्ध नसल्याने पंतप्रधान आवास योजनेला गती मिळू शकली नाही. घर होण्यासाठी जागा हा मुख्य प्रश्न असून, तो लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे सोडवता येवू शकतो. महाराष्ट्रासह देशात हा कायदा असतित्वात आल्यास घरकुल वंचितांचा प्रश्न मिटून, आधुनिक उपनगराची निर्मिती होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, ओम कदम, सखुबाई बोरगे, हिराबाई ग्यानप्पा, बाबा शेख, अनिता कासार, किशोर मुळे आदिंसह शहर व उपनगरातील घरकुल वंचित महिला उपस्थित होत्या.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा