Breaking News

श्रमिकनगर येथील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्वेटरच्या माध्यमातून मायेची ऊब

अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून, संस्काराने त्यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने श्रमिकनगर येथील मार्कंडेय शाळेत चालविल्या जाणार्‍या गदाधर अभ्युदय प्रकल्पातंर्गत दत्तक घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना थंडी निमित्त स्वेटर, टॉयलेटरी किट व खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे सचिव सुनिल होरणे, मच्छिंद्र कातोरे, वैशाली वरुडे, शोभा बडगू, सुनिता जक्का, रंजना वाघ, कांचन कुंटला आदि उपस्थित होत्या.



श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्या वतीने तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने श्रमिकनगर येथील मार्कंडेय शाळेत शिकणार्‍या 50 विडी कामगारांची मुले दत्तक घेण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यांना शैक्षणिक सुविधांपासून कला, क्रीडासाठी लागणार्‍या सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्यांच्यावर संस्काराची रुजवण करुन, त्यांच्या शाररीक विकासासाठी पौष्टिक आहार दररोज दिला जात आहे.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा