बोडखे यांची शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या परिवर्तन मंडळाचे संचालक बाबासाहेब बोडखे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा आ.शिवाजी कर्डिले व युवा नेते सुजय विखे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
यावेळी आ.शिवाजी कर्डिले म्हणाले की, बाबासाहेब बोडखे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून, प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला आहे. शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलने उभी केली आहेत. न्याय हक्कासाठी तळमळीने भांडणारा सच्चा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

सुजय विखे यांनी विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळणे, शिक्षकांची विविध प्रकारची अशैक्षणिक कामे बंद करणे, वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट देणे, अंशदायी योजना बंद करून पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करणे, ऑनलाइन ची कामे बंद करणे या विषयावर बोडखे सरांचे आंदोलन संघटनेच्या माध्यमातून चालू आहे.
त्यांच्या या लढ्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयसिंह पाटील, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रा.संजय अनभुले, प्रा.डॉ. गायकवाड सर, वैभव सांगळे, गुंजाळ आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा