Breaking News

आत्मविश्वास, परिपूर्ण तयारी व सादरीकरण उत्तम असेल तर यश प्राप्ती निश्चित - नॅन्सी कटयाल.

लोकांसमोर बोलण्याची भीती त्यापेक्षाही लोकांचे रोखून पाहणे जास्त भीतीदायक वाटते. ही भीती कमी करायची असेल तर प्रथम आरशासमोर बोलण्याचा सराव करा. स्वतःचे विचार स्पष्ट समजतील अशा पद्धतीने बोला, आत्मविश्वास, परिपूर्ण तयारी व सादरीकरण उत्तम असेल व पहिल्याच भेटीत स्वतःचा प्रभाव पडला तर यश प्राप्ती निश्चित असे मत पुण्याच्या इमेज बिल्डींग कन्सल्टन्ट नॅन्सी कटयाल यांनी व्यक्त केले.



आयएमएस सीडीआरच्या इंव्हेंट मॅनेजमेंट कोर्सच्या यशस्वी विदयार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरण पुण्याच्या इंव्हेंट मॅनेजमेंट तज्ञ सुमीरा चंडोक व इमेज बिल्डींग कन्सल्टन्ट नॅन्सी कटयाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी यश प्राप्ती मंत्र व डेकोरेशन थीम डेव्हलपमेंट वर या दोघींनी मार्गदर्शन केले.


यावेळी विक्रम बार्नबस, प्रा.डॉ.उदय नगरकर, अभ्यासक्रम समन्वयक सौ.श्रद्धा गांधी उपस्थित होते.उपस्थितांचे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कटयाल म्हणाल्या की, मनापासून इच्छा व ध्येय निश्चित असेल तर अशक्य त्या गोष्टी सहज शिकता येतात व करता येतात. उत्तम वक्ता होण्यासाठी वेशभूषा, देहबोली कशी असावी, हस्तांदोलनाच्या चुकीच्या व योग्य पद्धती यांचे प्रात्यक्षिकासह त्यांनी मार्गदर्शन केले.

सुमिरा चंडोक यांनी सांगितले की, आजच्या काळात थीम वर आधारित डेकोरेशनला अधिक महत्व आले आहे. कमी खर्चात व ग्राहकांच्या विचारांना अनुसरून नव्या कल्पनांवर आधारित डेकोरेशन करण्याकडे या यशस्वी विदयार्थ्यांनी भर द्यावा. तसेच भविष्यात उत्तम करियर म्हणून या क्षेत्राकडे पहावे व पालकांनी याचा विचार करावा असे आवाहन केले.

सर्वांचे स्वागत विक्रम बार्नबस यांनी केले .प्रास्ताविकात अभ्यासक्रमाच्या समन्वयक सौ.श्रद्धा गांधी यांनी इंव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स विषयी माहिती दिली. नगर मध्ये याविषयी जागृती वाढत असून या कोर्समध्ये नव्या कल्पना कशा साकाराव्यात, प्लानिंग कसे करावे याचे परिपूर्ण ज्ञान विदयार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमाची नवीन बँच लवकरच सुरु होत असून अधिक माहिती व प्रवेशासाठी ९४२२०८१०९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

आचल जाजू,पल्लवी भंडारी,आशिष ससाणे,आकाश दळवी,फिजा राजे,नादिया शेख,प्रिया मिसाळ,शिवानी वाकळे ,पूजा सिंधानी ,स्नेहल सांगळे,अंकिता स्वामी,कीर्ती गुंदेचा,वैष्णवी विधाते,सिद्धी देसरडा या यशस्वी विदयार्थ्यांना मान्यवरांनी प्रमाणपत्रे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती गुंदेचा हिने केले तर आभार पल्लवी भंडारीने मानले.कार्यक्रमास विदयार्थी,माजी विदयार्थी, पालक ,डेकोरेशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा