केसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा !
राणेंच्या भाजपप्रवेशामुळे दीपक केसरकर यांनी राणेंवर सडकून टीका केली होती. 'तुम्ही ज्यांना घेताय. त्यांच्यावर किती केसेस आहेत. मुलांवर किती केसेस आहेत. कुठल्या चौकशा सुरू आहेत हे जरा तपासावे, पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे ते पाळतील अशी आशा करूया अशी टीका केसरकरांनी केली होती.केसरकरांच्या या टीकेचा समाचार घेत राणे आता थेट 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
