Breaking News

15 मिनिटांत डेंग्युचे निदान करणारे कीट विकसित

पुणे, दि. 18, नोव्हेंबर - अवघ्या 15 मिनिटांत डेंग्युचे निदान करणारे अनोखे कीट डॉक्टर नविन खन्ना यांनी विकसित केले आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या उपस्थितीत अंजनी माशेलकर इन्क्लुसिव्ह इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

खन्ना यांनी केलेले संशोधन हे खर्‍या अर्थाने मेक इन इंडियाचा आविष्कार असल्याचे मत यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटर तर्फे पुण्यात राष्ट्रीय सामाजिक नवनिर्माण परिषद भरवण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. नविन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. देश-विदिशातील अनेक मान्यवर संशोधक, उद्योजक तसेच समाजसेवी याप्रसंगी उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटकाला उपयोगाचे ठरेल अशा संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न या माध्यमातून या पुढेही सुरू राहणार आहेत.