२२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस.
सलमान खान आणि कतरिना कैफ. ही जोडी 'टायगर जिंदा है' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यामध्ये कतरिना आणि सलमानचा जबरदस्त ॲक्शन अवतार दिसत आहे.
या ट्रेलरला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला असला, तरी सिनेरसिक थोडे नाराज आहेत. कारण, या ट्रेलरमध्ये कुठेही सलमान-कतरिनामध्ये लव्ह मेकिंग केमेस्ट्री दिसत नाही आणि असे मुद्दाम केले गेले आहे, असे करण्यामागे दुसरे कोणतेही कारण नसून फक्त सलमान खान आहे.
सलमानने सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना कतरिना आणि त्यामधील कोणताही लव्ह मेकिंग सीन ट्रेलरमध्ये प्रदर्शित करू नये, असे सांगितले होते. कारण, या दोघांची केमेस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात यावे, अशी अपेक्षा सलमानला आहे.
रील लाईफच्या या जोडीला रिअल लाईफमध्ये सुद्धा एकत्र बघण्याची सिनेरसिकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच 'बिग बॉस' या रिॲलिटी शोमध्ये 'टायगर जिंदा है'चे पहिले गाणं प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याचं शूटिंग ऑ्ट्रिरयामध्ये झाले असून या गाण्यात दोघांची रोमॅण्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. २२ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
