देशांतर्गत विमान प्रवास आता सुट्टीच्या कालावधीमध्ये स्वस्त
मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास आता सुट्टीच्या कालावधीमध्ये स्वस्त करण्यात आला आहे. विविध विमान कंपन्यांनी आपल्या दरांमध्ये सवलती व योजना जाहीर केल्या आहेत. एअर एशियाने प्रवासभाडे २९९९ रुपयांमध्ये परदेशी प्रवासासाठी व १०९९ रुपये देशांतर्गत प्रवासासाठी घोषित केले आहे.
विस्तारा, एअर एशिया व इंडिगो या विमान कंपन्यांनी आपल्या विमान प्रवासांचे दर असे कमी केल्याने मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. एअर एशियाने एकमार्गी प्रवासाधारित भाडे देशांतर्गत प्रवासासाठी ९९ रुपये केले आहे. त्यांच्या इंडियन जेव्ही एअरलाइन नेटवर्कद्वारे त्याचा लाभ घेता येणार आहे.

तसेच ४४४ रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांद्वारे मर्यादित कालावधीसाठी देशांतर्गत प्रवास करता येईल. मात्र, हा प्रवासलाभ घेण्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे. हा प्रवास मे २०१८ ते जानेवारी २०१९ या दरम्यानचा असणार आहे.