अवैध मद्यासह दोघांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
कल्याण, दि. 05, नोव्हेंबर - गोव्याहून बेकायदेशीररित्या मद्य विकणा-या रंजन शेट्टी व हिरामण म्हात्रे या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. या दोघांकडून अवैध दारू साठ्यासह दोन गाड्या व एक कंटेनरसह 14 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजू जॉन व त्यांच्या पथकाला गोव्याहून बेकायदेशीररित्या मद्य आणून कल्याण-डोंबिवली व आजूबाजूच्या ग्रामीण भागात विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कल्याण-शीळ मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.