मुग्धा, वैष्णवी, रितिका, मालविकाची विजयी घोडदौड
नागपूर, दि. 05, नोव्हेंबर - प्रतिभावंत बॅडमिंटनपटू मुग्धा आग्रे, वैष्णवी भाले, रितिका ठक्कर, मालविका बन्सोड, मृण्मयी सावजी व राशी लांबेने महिला एकेरीच्या दुसजया फेरीत प्र तिस्पर्धीला नमवून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली आयोजित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले. परंतु, पुरुष एकेरीमध्ये गौरव रेगे व सारंग लखानीला पराभवाचा सामना करावा लागला व त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शनिवारपासून वैयक्तिक गटातील सामने प्रारंभ झाली. संध्याकाळच्या सत्रात झालेल्या महिला एकेरीतील दुस-या फेरीत द्वितीय मानांकित मुग्धा आग्रेने उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत दिल्लीच्या अनन्या गोईलला 21-18, 21-16 असे सहज नमविले. हा सामना 29 मिनिटे रंगला. नवव्या मानांकित वैष्णवी भालेला 38 मिनिटे झुंज द्यावी लागली. परंतु, अनुभवाच्या बळावर वैष्णवीने प्रियंका कुमावतला 21-12, 19-21, 21-15 असे नमवून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत भरारी घेणाजया रितिका ठक्करने उत्कृष्ट खेळाच्या बळावर 24 मिनिटात मेहरिन रिझाला 21-13, 21-9 असे पराभूत केले. पहिल्या फेरीत रितिकाने अरुणाचल प्रदेशाच्या ला यजूमला 21-18, 21-8 असे पराभूत करून विजयी सलामी दिली होती. प्रतिभावंत बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने आक्रमक खेळाच्या बळावर वर्षा व्यंकटेशने 21 मिनिटाच्या खेळात 21-6, 21-11 असा पराभवाचा धक्का दिला. पहिल्या फेरीत मालविकाने छत्तीसगडच्या इशिता मंचदर कुमारला 21-17, 21-12 असे पराभूत केले होते. मृण्मयी सावजीही स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यात यशस्वी ठरली. दुसजया फेरीत मृण्मयीने अशा अरमुगमला 21-9, 21-11 असे सरळ पराभूत केले. हा सामना 25 मिनिटे झाला. स्पर्धेतील पहिल्या लढतीत मृण्मयीने हिमाचल प्रदेशच्या दिव्या दुग्गलला 21-10, 21-10 असे पराभूत करून विजयी सुरुवात केली होती. राशी लांबेने दुसजया फेरीतील लढतीत उल्लेखनिय कामगिरीच्या बळावर 21 मिनिटाल अंगिता नैरेमला 21-14, 21-19 असे पराभूत करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले. पहिल्या फेरीत राशीने आंध्रप्रदेशच्या आर. हसिनी संतोषीली 21-5, 21-10 असे नमविले होते.
मिश्र दुहेरी सामन्यात नागपूरच्या वैष्णवी भाले व निहार केळकर या जोडीने उत्कृष्ट खेळाच्या बळावर हिमाचल प्रदेशच्या सी. योगेश व आरजू ठाकूर या जोडीला 21-15, 21-11 असे सरळ पराभूत करून विजयी सुरुवात केली. महिला दुहेरीमध्ये नागपूरच्या मृण्मयी सावजी व मानसी गाडगीळ या जोडीने आसामच्या बोमाली कोवर व अंकिता राजखोवा या जोडीला 21-14, 21-10 असे नमविले. नागपूरच्या रितिका ठक्कर व मुंबईच्या सिमरन सिंघी या जोडीने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हिमाचल प्रदेशच्या आरजू ठाकूर व निर्मला या जोडीवर 21-4, 21-3 अशी दमदार मात केली. मुळची नागपूरची व पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करणा-या अरुंधती पानतावणे व गुजरातच्या ए. पारेख या जोडीने मिझोरमच्या एल. रिनझुआली व रियात पुली लाल या जोडीला 21-9, 21-13 असे सहज पराभूत करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.