12 बीओटी प्रकल्पांचा चौकशी अहवाल गुलदस्त्यातच
कल्याण, दि. 19, नोव्हेंबर - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 12 बीओटी प्रकल्पांचा चौकशी अहवाल गेल्या चार वर्षांपासून गुलदस्त्यातच आहे. चौकशी अहवाल सादर क रण्यासाठी तब्बल 8 वेळा कोकण विभागीय आयुक्तांकडे राज्य सरकारने पत्रव्यवहार केला. मात्र, अद्यापही हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलेला नसल्याची धक्कदायक माहिती उघडकीस आली आहे.
बीओटी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची त्वरीत दखल घेत राज्य सरकारने 8 जुलै 2013 रोजी क ोकण विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे.

12 बीओटी प्रकल्पांच्या चौकशी अहवाल उपलब्ध करू न द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. यानंतर विभागीय कोकण आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अद्यापही चौकशी अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आ. शिंदे यांना दिली.