मुंबई, दि. 19, नोव्हेंबर - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना दोषी घोषित केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे. खा. चव्हाण म्हणाले की, कोपर्डीचे निर्भया प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे आहे. त्यातून या आरोपींची मानसिकता निश्चितपणे दिसून येते. या प्रकरणाची दाहकता पाहता आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून अशा प्रकारचे अपराध महाराष्ट्रात पुन्हा घडणार नाहीत.
कोपर्डी : आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी - खा. अशोक चव्हाण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:09
Rating: 5