Breaking News

केरळमधील "लव्ह जिहाद" कुटुंबीयांनी मला 11 महिने कैदेत डांबल्याचा आरोप !

मला स्वातंत्र्य हवे आहे : हादियाने मांडली सर्वोच्च न्यायालयात भूमिका .

नवी दिल्ली : धर्मांतर करुन हादिया बनलेली केरळची अखिला अशोकन सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आपली भूमिका मांडली. मला देशातील सुजाण नागरिक व्ह्यायचे आहे. मला उत्तम डॉक्टर बनायचे. पुन्हा शिक्षण घ्यायचे असून, आता माझी जबाबदारी पतीच घेईल, असे हादियाने सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले. 

तसेच मला 11 महिने कुटुंबीयांनी कैदेत डांबून ठेवले होते, असा आरोपही तिने आपल्या कुटुंबियांवर केला. केरळमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याबाबत हादिया म्हणाली, मला स्वातंत्र्य हवे. 11 महिन्यांपासून मला सक्तीने डांबून ठेवण्यात आले असून माझी जबाबदारी माझ्या पतीचीच आहे. त्यामुळे आता न्यायालयाने हादियाची तिच्या पित्याच्या तावडीतून सुटका केली आहे. 

पुढील शिक्षणासाठी तिला सालेममधील महाविद्यालयात पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. धर्मांतरानंतर हादियाने मुस्लीम तरुणाशी केलेला विवाह केरळ उच्च न्यायालयाने रद्द केला होता. शिवाय तिला वडिलांकडे सोपवावं, असा आदेशही हायकोर्टाने दिला होता. काही जण हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगत विरोध करत आहेत.